ताजिया जुलूस मध्ये मुस्लिम धर्मीयांसह ईतर ही समाज बांधवांचा उत्स्फूर्तपणे सहभाग.
उल्हासनगर:- नीतू विश्वकर्मा
मोहरम हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. मोहरमपासून हिजरी संवत सुरू होते.हिजरी संवतचा हा पहिला महिना असतो.
इस्लाम मध्ये रमजान नंतर या मोहरम महिन्याला खूप महत्व आहे,मोहरम महिन्याच्या १० तारखेला ताजिया चा जुलूस काढला जातो.
उल्हासनगर येथील शहाड फाटक,आझादनगर,गुलशन नगर या मुस्लिम लोकवस्ती असलेल्या ठिकाणी मोहरम निमित्त मोठा जुलूस निघतो,या जुलूस मध्ये मोठ्या प्रमाणात सर्वधर्मीय बांधव सामील होतात,शहाड फाटक नामदेववाडी येथून सुरू झालेल्या जुलूस ची सांगता गुलशन नगर मार्गे उल्हासनदी मध्ये ताजिया आणि ताबूत चे विसर्जन करून झाली.
यावेळी उल्हासनगर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा श्री पप्पू कलानी,मनसेचे जिल्हा सचिव संजय घुगे,राष्ट्रवादिचे शहर प्रवक्ते कमलेश निकम,बिंदर पा,मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख,विभाग अध्यक्ष गणेश मढवी, उप-विभाग अध्यक्ष विठ्ठल मोरे,शाखा अध्यक्ष अमित सिंग तसेच ईतर पक्षातील ही अनेक मान्यवर मंडळी जुलूस मध्ये सामील झालेली होती.
शौर्य टाइम्सच्या वतीने मैनुद्दीन शेख आणि तमाम मुस्लिम समाजाला मोहरमच्या हार्दिक शुभेच्छा.