कल्याण:- नीतू विश्वकर्मा
सप्तशृंगी माता वणी (नाशिक) खान्देश ची माता नाशिक,धुळे,नंदुरबार,जळगाव,चाळीसगाव,मालेगाव व आजूबाजूच्या परिसरातील लाखो गोर-गरीब व आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान असलेली गरिबांची माता. गडावर दररोज आईच्या दर्शनासाठी हजारो लोक येत असतात, चैत्र पौर्णिमा व नवरात्र उत्सवा च्या वेळी तर लाखोंच्या संख्येने भावीक आईच्या दर्शनासाठी येथे येत असतात.
स्थानिक ग्रामपंचायत सदस्य तर येथे दरवर्षी 1 कोटी च्या वर भावीक आईच्या दर्शनासाठी येत असल्याचे सांगतात. साडेतीन शक्तीपीठापैकी हे आद्यपीठ असलेले इतके मोठे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असून देखील येथे नागरिकांना लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा या येथे नक्कीच कमी पडतात. येथे येणाऱ्या गोरगरीब व आदिवासी भाविकांना स्नानगृह,शौचालय व वस्त्रांतर गृह( चेंजिंग रूम)उपलब्ध नसल्याने अनेक भाविक हे तेथे असलेल्या तलावावर आंघोळीसाठी जातात व उघड्यावरच शौचालयासाठी जात असतात. गडावर कुठल्याही हॉटेल किंवा ट्रस्ट ने बांधलेल्या रूम चे भाडे कमीतकमी २०० रु. ते जास्तीत जास्त ४००० रु. पर्यंत आहे, जे गोरगरीब व अदिवासी बांधवांना मूलभूत सोयीसुविधा साठी घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
या समस्ये संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांसोबत आमचे गुरुपौर्णिमा च्या दिवशी बोलणे झाले व येथे १० रु. मध्ये स्नानगृह (गरम पाणी देखील उपलब्ध असेल)/ शौचालय(वेस्टर्न व साधे)तसेच कपडे बदलण्यासाठी वस्त्रांतर गृह (चेंजिंग रूम)उपलब्ध करून देण्या संदर्भात आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांना सांगितले. या संदर्भात मी कल्याण लोकसभेचे खासदार मा. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याकडे या गंभीर विषयावर चर्चा केली व मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात तातडीने लक्ष घालून या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा ही विनंती केली.खासदार साहेबांनी या विषयावर जातीने लक्ष घालून येथे लागणारा सर्व निधी हा उपलब्ध करून दिला जाईल असा मला २ दिवसांपूर्वी शब्द दिला होता, आज खासदार साहेबांनी मला बोलावून घेतले व मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्यापुढे हा विषय घेतला, मुख्यमंत्री साहेबांनी देखील या कामा संदर्भात लागणारा सर्व निधी हा तातडीने उपलब्ध करून देणार असल्याचे आज आम्हाला सांगितले व त्याबाबत संबंधितांना तातडीने हे काम मार्गी लागले पाहिजे तसेच लवकरात लवकर याचा डी. पी. आर. तयार करावा या शब्दात सूचना देखील दिल्यात.
या संदर्भात लागणारी जागा ही सप्तशृंगी गड ग्रामपंचायत सदस्यांने तातडीने ठराव करून मंजूर देखील करून दिली आहे व तसे लेखी पत्र देखील दिले आहे व भविष्यात याची देखभाल व निगा ग्रामपंचायत मार्फत व्यवस्थित केली जाईल हे देखील सांगितले आहे. सदर ठिकाणी महिलांसाठी ५० स्नानगृहासह शौचालय व चेंजिंग रूम व पुरुषांसाठी ५० स्नानगृहासह शौचालय व चेंजिंग रूम असे एकूण १०० युनिट बांधण्याचे प्रयोजन आहे, येथे मोठ्या प्रमाणावर पाणी लागणार असल्याने येथे ग्रामपंचायत च्या मालकीची असलेल्या विहरी चा देखील वापर करण्यात येणार आहे तसेच येथे बोअरवेल चे देखील नियोजन करण्यात येणार आहे, सदर बोअरवेलला रेनवॉटर हार्वेस्टिंग व त्याच्या २० फूट अंतरावर शोषखड्डा देखील करण्यात येणार आहे त्यामुळे पावसाचे पाणी थेट बोअरवेल व शोषखड्ड्यात सोडल्याने भविष्यात येथे पाणीटंचाई ची समस्या होणार नाही, तसेच येथे लाईट ची समस्या होऊ नये म्हणून सोलर तंत्रज्ञानाचा वापर देखील येथे करण्यात येणार आहे. ही सर्व सेवा २४ तास लोकांना उपलब्ध व्हावी याचे देखील प्रयोजन करण्याचा प्रयत्न आहे.या सर्व सुविधा केवळ १० रु. मध्ये येथे मिळणार आहे व टोकन पद्धत देखील डिजीटल पद्धतीचा वापर करून येथे करण्यात येणार आहे.
साधारण १४ गुंठे जागा या कामासाठी लागणार आहे, सदर जागेला चारही बाजूने कंपाउंड, सी. सी. टीव्ही.,छोटेशे गार्डन व काही जागेत पावसापासून व उन्हापासून संरक्षण व्हावे याकरिता शेड मारून त्याखाली भाविकांना बसण्यासाठी बेंचेस ची देखील व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.
मी कल्याणकर सामाजिक संस्था(रजी.)महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब व कल्याण लोकसभेचे खासदार मा. श्री. श्रीकांतजी शिंदे साहेब यांना मनापासून धन्यवाद देते व त्यांचे मनापासून आभार मानते.
आई सप्तशृंगी माता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब व कल्याण लोकसभेचे खासदार मा.श्री. श्रीकांतजी शिंदे साहेब यांना उदंड व निरोगी आयुष्य देवो व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करी.