स्वातंत्र्याच्या अमृतमोत्सवानिमित्त तहसीलदार कार्यालयं व अशोका फाउंडेशन च्या वतीने शासकीय दाखले वाटप शिबीर संपन्न.
उल्हासनगर- नीतू विश्वकर्मा
स्वातंत्र्याच्या अमृतमोत्सवानिमित्त तहसीलदार कार्यालयं व अशोका फाउंडेशन च्या वतीने शासकीय दाखले वाटप शिबीर संपन्न.
शाळा आणि महाविद्यालय सुरू झाली आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामासाठी रहिवाशी दाखला व उत्पन्नाचा दाखला हे शासकीय दाखले शिक्षण कामासाठी गरज लागते व तेव्हा विद्यार्थी व पालकांना तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. ही बाब लक्षात घेऊन अशोका फाउंडेशन मार्फत सम्राट अशोक नगर, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय मध्ये गेली सलग 15 वर्षापासून हे शासकीय दाखले वाटप शिबीर राबवण्यात येते या वर्षी देखील या शिबिराला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला.
तहसील कार्यालयामार्फत तलाठी चव्हाण साहेब, महा इसेवा चे अमर पवार सर यांनी शिबिराचे प्रतिनिधित्व केले.
या शिबिरात प्रमुख उपस्थिती म्हणून पॅनल क्र 18 च्या माजी नगरसेविका सविताताई तोरणे (रगडे), माजी नगरसेवक महादेव सोनवणे, माजी नगरसेवक गजानन शेळके, फिरोझ खान, पत्रकार रामेश्वर गवई, दशरथ चौधरी, दुर्गेश पांडे, आदिनाथ पालवे,सुखदेव उगले, जी.टी पवार सर, मुख्याध्यापिका मीनाक्षी सोनवणे, अशोका फाऊंडेशनचे संस्थापक शिवाजी रगडे, अशोका फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद घनबहादूर, समाधान वाघ व तसेच सर अशोका फाउंडेशन चे सदस्य उपस्थित होते.