Ulhasnagar
रिपब्लिकन रिक्षा चालक मालक युनियन उल्हासनगर येथे भव्य तिरंगा रिक्षा रॅली संपन्न.
उल्हासनगर:- नीतू विश्वकर्मा
अध्यक्ष बहादुर कतोरीया(भाई) यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑगस्ट अमृत महोत्सव निमित्ताने भव्य रॅलीचे आयोजन
ठाणे/प्रतिनिधी :- रिपब्लिकन रिक्षा चालक मालक युनियन उल्हासनगर यांच्या वतीने 15 ऑगस्ट अमृत महोत्सव निमित्ताने भव्य दिव्य अशा तिरंगा रॅलीचे आयोजन शहरात करण्यात आले होते. संपूर्ण देशामध्ये अमृत महोत्सव निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने उल्हासनगर येथील रिक्षा चालक मालक युनियन यांनी ही भव्य अशा तिरंगा रॅली काढून आनंद उत्साव साजरा केला. व सर्व शहरवासीयांना अमृत महोत्सव व 15 ऑगस्ट निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर , स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन रिक्षा चालक मालक युनियन उल्हासनगर शहराध्यक्ष श्री बहादुर कतोरीया(भाई), कार्य अध्यक्ष श्री.रॉकी कतोरीया हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सम्यक वर्तमानकाळ न्युज पेपर चे सहसंपादक ठाणे अनिल बंगाळे हे उपस्थित होते. या रॅली मध्ये सुभाष सिंग , बींनी रॉय, अब्दुल क शेख, करून वर्मा,कारमजीत शिंग सोनू कुलकर्णी, अँड्र्यू पाली,वसिम शेख,अन्वर भाई,परशा मामा, प्रविण वासनिक, विनोद कांबळे,अनिल यादव,संजय गवळी, जोगदंड,सलीम शेख, मुकेश बहीणबाळ, अनिल सिंग, सर्जेराव,जावेद शेख, भाऊसाहेब सोनवणे,गोतम कोरगे,गुडु तिवारी, टाइगर,विषू,रवि पांचाळ,राजू शिंदे, संजय गवई आदी उपस्थित होते.
शौर्य टाइम्सच्या तर्फे रिपब्लिकन रिक्षा चालक मालक युनियन स्वतंत्रता दिवस सजरा केल्या बद्दल अभिनंदन.