headlineUlhasnagar
उल्हासनगरात वृक्ष तोडणारयांचे सुळसुळाट.
उल्हासनगर:- नीतू विश्वकर्मा
आजचं अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले आपण पाहिले असेल विनापरवाना झाडाची कत्तल केल्यास कारावास भोगावा लागेल.शासनाने दिलेल्या नियम फाट्यावर मारत उल्हासनगर मधील बेरेक क्रमांक ७४८ तसेच रूम नं ५,६,७,८ उल्हासनगर क्रमांक:०२ मधील आठ वर्षे जुने झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. घराचे बांधकाम करण्यासाठी झाडांची कत्तल केलेले फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत. एका बाजूस सरकार माझी वसुंधरा अभियान राबवत आहेत आणि दुसरीकडे झाडांची कत्तल करण्यात येत आहे. उल्हासनगर महानगरपालिकेतील अधिकारी आणि वन विभागातील अधिकारी वर्ग वृक्ष तोडणाऱ्यावर कारवाई करणार का याकडे सर्व पर्यावरण प्रेमी चे आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.