अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली पाणी गळती तात्काळ सोडविण्यात आली.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
गुरुवार दि.२७.१०.२०२२ रोजी मा.आयुक्त महोदय यांच्याशी पिण्याच्या पाणीच्या पाईपलाईनचे लीकेज संदर्भात चर्चा झाली ज्यात उल्हासनगर शहरातील खास करून लालचक्की परिसर, रामनगर, सीताराम नगर, स्टेशन परिसरातील विषयातून मा.आयुक्त साहेबांचे लिकेज संदर्भात लक्ष वेधले असता मा.आयुक्त साहेबांनी सदर लिकेज तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश दिले असता आज दि.२८.१०.२०२२ रोजी महापालिकेमार्फत लिकेजचे काम सुरू झाले व अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली पाणी गळती अखेर सोडविण्यात आली. सदर कामास लिकेज शोधण्यास कर्मचारी यांना त्रास होत होता. शुक्रवार असल्याने महापालिकेचे टँकर देखील बंद होते परंतु काम पूर्ण करण्याच्या हेतूने खासगी टँकर मागवून ज्याची रक्कम स्वःतः प्रदिप गोडसे यांनी आपल्या खिशातून अदा करत टँकरच्या पाण्याच्या सहाय्याने व प्रवाहामुळे लिकेज त्वरित लक्षात आले व संबंधित २० फूट पाईप संपूर्ण खराब असल्याने तो देखील बदली करण्यात आला.
सदर कामास उल्हासनगर महानगरपालिका यांच्या सहकाऱ्याने काम यशस्वी रित्या पार पाडले गेले त्याबद्दल उल्हासनगर महानगरपालिकेचे मनःपूर्वक आभार. ! आणि सोबत विशेषतः अतिरिक्त आयुक्त जमीर लेंग्रेकर साहेब यांनी देखील मदत केल्याबद्दल त्यांचे देखील आभार..!