उल्हासनगर महानगर पालिका द्वारा राष्ट्रीय एकता दिवस तसेच फिट इंडिया फ्रीडम रण (एकता दौड) चे आयोजन.
उल्हासनगर नीतू विश्वकर्मा
मा. सचिव संस्कृती मंत्रालय व महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार उल्हासनगर महानगरपालिका द्वारा भारतीय स्वातंत्र्याचे औचित्य साधून तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व स्वातंत्र्यत्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता दौड चे आयोजन सोमवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी उल्हासनगर महानगरपालिकाचे प्रशासक तथा आयुक्त अजिज शेख यांच्या आदेशानुसार महानगरपालिका मुख्यालय ते गोल मैदान पर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले यावेळी मा प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख साहेब अतिरिक्त आयुक्त (सेवा) डॉ. करुणा जुईकर उप आयुक्त मुख्यालय अशोक नाईकवाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पगारे प्रतिभा कुलकर्णी महापालिका सचिव प्रभाग अधिकारी अजित गोवारी सिस्टीम अनालीसेस श्रद्धा बाविस्कर भांडार विभाग प्रमुख अंकुश कदम,अग्निशमन सुरक्षा विभागाचे बाळासाहेब नेटके तसेच इतर सर्व अधिकारी /कर्मचारी सदर यांनी एकता दौड मध्ये सहभाग घेतला या राष्ट्रीय एकता दिवस तसेच फिट इंडिया फ्रीडम रन एकता दौड ची सुरुवात उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालय पासून सुरू होऊन गोल मैदान उल्हासनगर-२ या ठिकाणी समापन करण्यात आली या वेळी उल्हासनगर महानगरपालिका चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालय समोर उपस्थित राहून राष्ट्रीय एकता दिवस तसेच फिट इंडिया फ्रीडम रण (एकता दौड) मध्ये सहभागी झाले होते