उल्हासनगर – ५ येथील शासकीय जागेवर एम.एम.आर.डी.ए. मार्फत सिंधू संस्कृती भवन व बहुमजली वाहनतळ उभारण्यात यावे.
मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांची लेखी मागणी.
उल्हासनगर –नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर-५ येथे महाराष्ट्र शासनाची मालकी असलेली सि.टी.एस. क्र.२५७९८,२५७९९ एकूण क्षेत्रफळ : २४४२.४० चौ.मी. जागेवर ब्रिटीश राजवटीत थियटर उभारण्यात आले होते व कालांतराने याठिकाणी धान्याचे कोठार करण्यात आले. सद्या ही जागा विनवापर असल्याने याठिकाणी एम.एम.आर.डी.ए. मार्फत सिंधू संस्कृती भवन तसेच उल्हासनगर -५ येथीलच मच्छी मार्केट परिसरातील संत कवरराम नगर समाज मंदिराच्या ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारण्यात यावे अशी लेखी मागणी आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे यांची शुक्रवारी शासकीय निवासस्थान वर्षा याठिकाणी भेट घेत केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे लेखी आदेश मुख्यमंत्री ना.श्री.शिंदे यांनी दिले आहेत.