उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्राण किटचे वितरण.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
दि. १ नोव्हेंबर २००५ नंतर महानगरपालिकेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक ०६.०६.२०२४ रोजी मनपा आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते प्राण किटचे वितरण करण्यात आले.
दि. १ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू केली होती. शासनाच्या धर्तीवर उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करुन, अशा कर्मचाऱ्यांना NSDL Protean सोबत करार करून PRAN (Permanent Retirement Account Number) प्राप्त करुन घेतले, आता या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतनातून कपात होणाऱ्या कर्मचारी अंशदान व मनपा अंशदानाच्या रक्कमा थेट शेअर बाजारामध्ये गुंतवल्या जाणार आहेत. यातून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या व्याजाचा परतावा हा भविष्य निर्वाह निधीपेक्षा जास्त राहिल, असे आयुक्त अजिज शेख यांनी यावेळी सांगितले.
सदर प्राण किटचे वितरण करतांना सहायक संचालक, नगररचना श्री. ललित खोब्रागडे, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, मुख्य लेखा अधिकारी श्री. किरण भिलारे, मुख्य लेखा परिक्षक श्री. शरद देशमुख, जनसंपर्क अधिकारी सौ. छाया डांगळे व संबधित कर्मचारी उपस्थित होते.