ॲड. कल्पेश माने विधानसभेच्या उपजिल्हाध्यक्ष पदी नियुक्ति.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अमित ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कल्याण लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष,श्री.अमित राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच मनसे नेते राजुदादा पाटील,मनविसे सरचिटणीस श्री.संदीप पाचंगे साहेब,श्री.अखिल चित्रे साहेब,अँड.सायली सोनवणे मॅडम,जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगरातील ॲड. कल्पेश माने यांची उल्हासनगर व अंबरनाथ या दोन विधानसभेच्या उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विविध आंदोलनांत मनसेचे कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप देशपांडे व ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना न्यायालयाकडून जामीन मिळवून देण्यासाठी ॲड. कल्पेश माने यांनी युक्तिवाद केला होता. त्यामुळे संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांना जामीन मिळाला होता. तेव्हापासून ॲड. माने हे प्रकाशझोतात आले असून त्यांना मनसेच्या विधी विभागातही महत्त्वाचे पद देण्यात आले आहे.