Dombivli Crime

चोरीला गेलेल्या १,१०,०००/- रुपये रकमेच्या दुचाकीसहित आरोपीला रामनगर पोलिसांनी केली अटक.

 




डोंबिवली: नीतू विश्वकर्मा


            १२ जानेवारी २०२३ रोजी दिलीप नारायण मराठे वय ७३ वर्षे राहणार डोंबिवली पूर्व पेंडसे नगर येथे त्यांनी पार्क केलेली MH 05 DN 7330 ही दुचाकी रात्री चोरीला गेली असता त्यांनी सदर गुन्ह्याची नोंद रामनगर पोलीस ठाणे मध्ये केली होती या संदर्भात रामनगर पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे. माहिती घेतली असता चोरी करणारा आरोपी अनुराग उर्फ गुड्ड्या विजय अडारी वय १९ याला अंबरनाथ पश्चिम येथून अटक करण्यात आली आहे. तसेच नमूद गुन्ह्यातील अटक आरोपी हा मोटर सायकल स्कूटर चोरीची गुन्हायामधील सराईत आरोपी असून त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने डोंबिवली पोलीस ठाणे व नारपोली पोलीस येथे चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे सादर गुन्ह्याचा तपास रामनगर पोलीस ठाणे डोंबिवली यांच्याकडून करण्यात आला. या तपासामध्ये अटक आरोपीकडून एकूण १,१०,०००/-किमतीचं दोन स्कूटर व मोटरसायकल अशी एकूण तीन वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.            

      सदरची यशस्वी कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुनील कुऱ्हाडे व रामनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर त्यासोबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे/योगेश सानप पोलीस हवालदार विशाल वाघ /प्रशांत सरनाईक /सुनील भांणगे/सचिन भालेराव शेखर कोळी पोलीस नाईक हनुमंत कोळेकर/तुलसीराम लोखंडे/पोअं शिवाजी राठोड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights