शिक्षण विभागातील अनियमितता व गैरकारभाराचा ठपका ठेवत प्रशासन अधिकारी हेमंत शेजवळ निलंबित; मात्र निलम कदम (बोडारे) यांच्या बेकायदेशीर लेखा लिपिक पदाच्या कार्यकाळावर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ?
हेमंत शेजवाल / नीलम कदम (बोडरे)
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण विभाग हे नेहमीच वादाच्या भोवर्यात अडकलेले.विविध कारणांमुळे शिक्षण विभाग कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे.निलम कदम यांची लेखा लिपिक पदावर झालेल्या बेकायदेशीर नियुक्तीनंतर शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली.उल्हासनगर महानगरपालिकेतील शिक्षण मंडळात लेखा लिपिक पद अस्तित्वात नसताना सुद्धा निलम कदम यांची शिक्षण मंडळात सर्व नियम धाब्यावर बसवून लेखा लिपिक पदावर नियुक्ती करण्यात आली.त्यावेळी निलम कदम यांच्या नियुक्तीचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला,त्यानंतरच्या काळात शिक्षण मंडळातील गैरकारभारा विरुद्ध देखील निलम कदम यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप झाले.
यादरम्यान निलम कदम यांच्या शिक्षण मंडळातील एकाधिकारशाहीमुळे शिक्षण मंडळाच्या कारभाराची दयनीय अवस्था होऊन पुरता बोजवारा उडाला.बँकेच्या खात्याचा वैयक्तिकरित्या वापर,निविदा प्रक्रिया पुर्ण नकरता आपल्या नातेसंबंधांसाठी उपक्रम राबविणे,शालेय पोषण आहाराचा मनमानी कारभार,शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचा घोळ यामुळेच लेखा परिक्षणात शिक्षण मंडळावर वेळोवेळी ताशेरे ओढले गेले. शिक्षण मंडळाच्या अखत्यारीत येत असणाऱ्या महापालिका शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे नियोजन तर झाले नाही उलट शिक्षण मंडळाला उपलब्ध होणाऱ्या निधीचा दुरुपयोग होऊन शिक्षण मंडळाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरकारभार झाला.
एकंदरीतच निलम कदम यांची शिक्षण मंडळाच्या लेखा लिपिक पदावरील नियुक्ती नंतरच्या कार्यकाळातच शिक्षण मंडळाच्या कारभारात मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरकारभार झाला असल्याचे दिसून येत असताना शिक्षण विभागाच्या मागील १२ वर्षाच्या कालावधीत झालेल्या या गंभीर स्वरूपाच्या अनियमितता व गैरकारभाराची स्थानिक निधी लेखा परिक्षण विभागाच्या माध्यमातून विशेष लेखा परिक्षण करण्यासाठी गेल्याच महिन्यात आयुक्तांनी विनंती केली होती.त्यानंतर लेखा परिक्षणाच्या काळातच चोरीचा प्रयत्न झाला असताना लेखा परीक्षण सुरू होण्यापूर्वी कागदपत्रांची लपवा छपवी करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना असा संशय व्यक्त करण्यात आला.आणि आता शिक्षण मंडळाच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी शिक्षण मंडळाच्या कारभारात अनियमितता व गैरकारभाराचा ठपका ठेवत शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी हेमंत शेजवळ यांचे निलंबन केले.
महापालिकेने हेमंत शेजवळ यांचे केलेले हे निलंबन तितकेसे आश्चर्यकारक नसून ते अपेक्षित असेच आहे.कारण की,निलम कदम यांच्या लेखा लिपिक पदावरील कालावधीत झालेल्या अनियमितता व गैरकारभाराचे हेमंत शेजवळ हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि निलम कदम यांचे अत्यंत विश्वासू सहकारी कर्मचारी पैकी एक असल्याने त्यांचा देखील शिक्षण मंडळातील अनियमितता व गैरकारभारात अप्रत्यक्षपणे का होईना सहभाग आढळून येतोय.म्हणून शिक्षण मंडळाच्या अनियमितता व गैरकारभाराचा ठपका ठेवून पालिका प्रशासनाने हेमंत शेजवळ यांचे निलंबन केले आहे.पण जो ठपका ठेवून महापालिकेने हेमंत शेजवळ यांचे निलंबन केले आहे.तोच ठपका ठेवून त्याच न्यायाने शिक्षण विभागात मागील १२ वर्षाच्या कालावधीत झालेल्या गंभीर स्वरूपाच्या अनियमितता व गैरकारभाराबद्दल महापालिकेने निलम कदम यांच्या वर देखील कारवाई करणे गरजेचे नाही का ? हा प्रश्न येथे उपस्थित होत असून महापालिकेच्या निलम कदम यांच्या बद्दल च्या भुमिकेबाबत शंका उत्पन्न करत आहे.