साऊ, जिजाऊ, फातिमा जयंती निमित्ताने संविधान प्रचार आणि कौटुंबिक हिंसाचार विषयावर परिचर्चा.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
सावित्रीमाई फुले, महामाता जिजाऊ आणि फातिमा शेख जयंती निमित्ताने कौटुंबिक महिला हिंसाचार सत्र राबविण्यात आले, १९ जानेवारी संध्याकाळी हिल लाईन आंबेडकर नगर, उल्हासनगर ५ येथे महामाया महिला संघटन आणि तानाजी नगर महिला संघटन अध्यक्षा मिरा सपकाळे, अनिता मोरे, मिना गायकवाड, सिता खंडागळे, लक्ष्मी मालुरे, जस्सी कौर, ममता शिंदे, नेर्भदा मगरे, लक्ष्मी जाधव, आशा मोरे, सविता मोरे, आस्मा शेख, नसरिम शेख, शिला हिवाळे, मंदा पाजगे, सोनु खंडागळे, सुलभा शिंपी आणि विजया हिवाळे, किरण शेख, सुनीता कदम, शोभा शिरवले शारदा निर्मल यानी परिश्रम घेतले.
प्रमुख उपस्थिती आणि वक्ते म्हणुन जेष्ठ-पत्रकार माजी नगर सेवक अन्याय विरोधी संघर्ष समितीचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार श्री दिलिप मालवणकर, प्रवासी संचार पत्रकार जगन्नाथ जावळे, तक्ष सामाजिक महिला संस्था अध्यक्ष मनीषा गोडसें व शशिकांत दायमा उपस्थित होते,
संविधान प्रचारक दिक्षा गायकवाड व शितल भंडारे यानी गीत गायनाच्या माध्यमातुन संविधान प्रचार केला.