EducationalUlhasnagar Breaking News

UPSC / MPSC व स्पर्धाक्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षाचे मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दया – म.न.वि.से.

 





उल्हासनगर:नीतू विश्वकर्मा 


 उल्हासनगर महानगर पालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक अभ्यास केंद्रात दररोज जवळपास 400 ते 450 विद्यार्थी UPSC / MPSC तसेच स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करण्यासाठी येतात.या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे सामान्य कुटूंबातील आहेत.हे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासासाठी जरी येत असले तरी या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शनाची गरज भासते व या आपल्या अभ्यास केंद्रात अशी सोय उपलब्ध नाही.यातील बहुतांश विद्यार्थी हे सामान्य कुटूंबातील असल्यामुळे या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे या विद्यार्थ्यांना खासगी क्लासेसचा खर्च परवडत नाही.त्यामुळे या विद्यार्थ्यांनां महापालिकेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचे वर्ग जर उपलब्ध करून दिले तर या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊन उल्हासनगर शहरातील विद्यार्थीही मोठया प्रमाणात स्पर्धापरीक्षेत उत्तीर्ण होतील असे तन्मेश देशमुख यांनी आयुक्तांना सांगितले.


 या अभ्यासकेंद्रात शैक्षणिक कार्यक्रमा व्यतिरिक्त कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये.कारण आपल्या मालमत्ता विभागाकडून महापालिकेच्या इतर कार्यक्रमांना परवानगी दिल्यामुळे या विदयार्थ्यांच्या अभ्यासात व्यतय निर्माण होतो असेही देशमुख यांनी सांगितले.तसेच या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी काही उपाययोजना करनेही गरजेचे आहे.1) या अभ्यासिकेत अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संपूर्ण चौकशी करूनच अभ्यासिकेत प्रवेश देण्यात यावा.2) प्रवेश घेतल्यानंतर या विद्यार्थ्याला एक ओळखपत्र महापालिकेच्या वतीने देण्यात याव.3) अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची दररोज नोंदणी करण्यात यावी.4) या विद्यार्थ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात यावे.5) या अभ्यासिकेत जनरल शिफ्टमध्ये चार स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावे यासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मनविसेच्या वतीने करण्यात आल्याची माहिती तन्मेश देशमुख यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights