Ulhasnagar Breaking News

अदानी उद्योग समूहाच्या गैरकारभाराविरोधात उल्हासनगर काँग्रेसचे आंदोलन.

 









उल्हासनगर:नीतू विश्वकर्मा



आज दिनांक ०६ फेब्रुवारी रोजी उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारा अदानी समूहाच्या गैर कारभारविरोधात उल्हासनगर -०४ येथील विठ्ठलवाडी पोलीस वसाहती समोरील LIC कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष श्री. रोहित साळवे यांच्या नेतत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. 


एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या देशाचे गौरव आहेत. या वित्तीय संस्थांमध्ये सर्वसामान्य, मध्यमवर्ग,नोकरदार,छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवला आहे,परंतु मोदी सरकारने अदानींच्या कंपन्यांमध्ये हा पैसा जबरदस्तीने गुंतवला आहे.अदानी समुहातील गैरकारभारामुळे एलआयसीच्या ३९ कोटी पॉलिसधारक व गुंतवणूकदारांचे ३३ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच भारतीय स्टेट बँक व इतर बँकांनी मिळून तब्बल ८० हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.

काँग्रेस पक्ष कोणत्याही उद्योगपतीच्या विरोधात नाही परंतु खास उद्योगपतीसाठी नियम बदलून जनतेचा पैसा धोक्यात घालण्यास काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच देशातील सामान्य जनतेच्या पाठीशी उभा राहिला आहे. या गैर कारभाराची संयुक्त संसदीय समिती मार्फत सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष श्री. रोहित साळवे यांनी केली.


उल्हासनगर काँग्रेसच्या ग्राहक संरक्षण सेलचे अध्यक्ष श्री. मोती लुढवाणी यांनी LIC व SBI मधील नागरिकांच्या ठेवी सुरक्षित राहण्यासंबंधी सरकारने संसदेत चर्चा करून जनतेला आश्र्वस्त करावं अशी मागणी केली.


यावेळी ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके,नानिक आहुजा, ग्राहक संरक्षण सेल अध्यक्ष मोती लुढवाणी, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष अहमद खान,अझीझ खान, शहबुद्धीनं खान,उपाध्यक्ष महादेव शेलार,पर्यावरण अध्यक्ष विशाल सोनवणे, प्रा. गेमनानी सर,मुन्ना श्रीवास्तव,फामिदा सय्यद,भारती फुलवरीया,विद्या चव्हाण,अमर जोशी,पवन मीरानी,दीपक गायकवाड, अन्सार शेख,योगेश शिंदे,मनोहर मनुजा,राजमोहन नायर,सुलक्षण भालेराव,आबा साठे,हिरामण तायडे, संतोष वानखेडे,संगीत बाविस्कर,किशोर धड़के सोबत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights