उल्हासनगर मापालिकेच्या शाळा क्रमांक 18 व 24 च्या पुंर्नबांधणी करा – मनसे
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर मानगर पालिकेची शाळा क्रमांक 18 व 24 ही शाळा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्या नंतर महापालिका प्रशासनाने पुर्नबांधणी साठी घेतली होती.परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे हया शाळांची पुर्नबांधणी थांबवण्यात आली होती.पुंर्नबांधणी साठी या शाळेची इमारत तोडून जवळपास 3 ते 4 वर्षाचा कालावधी उलटला असून या या शाळेच्या बांधकामातील तांत्रिक अडचणी दूर करून हया शाळेच्या बांधकामला तात्काळ सुरवात करण्यात यावी यासाठी आम्ही प्रशासनाला प्रत्यक्ष भेटून,निवेदनाद्वारे वारंवार विनंती सुद्धा केली आहे.खरं तर आत्ता पर्यंत हया शाळेची नवीन इमारत तयार होने अपॆक्षित होते परंतु प्रशासन या गोर-गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणा बाबत गंभीर दिसत नाही असा आरोप तन्मेश देशमुख यांनी केला.
ही शाळा पुंर्नबांधणी साठी तोडल्या नंतर प्रशासनाने या शाळेतील विध्यार्थ्यांची व्यवस्था ही इतर ठिकाणी केली परंतु ज्या ठिकाणी या विध्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे ती जागा शाळे पासून बरीच लांब आहे.त्यामुळे या विदयार्थ्यांना रोज मोठी पायपीठ करावी लागते.कारण या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे अंत्यन्त गरीब कुटूंबातील आहेत.त्यामुळे त्यांना रिक्षा किंवा इतर वाहनाने प्रवास करने परवडत नाही.तसेच ज्या ठिकाणी ही शाळा भरते त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत व यामुळे या गोर-गरीब विदयार्थ्यांच मोठ शैक्षणिक नुकसान होत आहे.या विदयार्थ्यांना त्त्यांच्या हक्काची शाळा लवकरात लवकर उपलब्ध करून देणे हे प्रशासनाच कर्तव्य आहे.परंतु या शाळांच्या पुर्नबांधणी बाबत प्रशासन कानावर हात व तोंडावर बोट ठेऊन आहे व ही बाब निषेधार्थ आहे.या शाळेच्या पुंर्नबांधणीच्या कामाला तात्काळ सुरवात करण्यात यावी व या गोर-गरीब विदयार्थ्यांना एक सुसज्य शाळा लवकरात लवकर उपलब्ध करून दयावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करेल असा इशाराही विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.यावेळी जिल्हा सचिव संजय घुगे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख,मनविसेचे उपजिल्हा अध्यक्ष ऍड कल्पेश माने विभाग अध्यक्ष सागर चौहान यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.