उल्हासनगर सुभाष टेकडी येथे पंचशील बुद्धविहार लोकार्पण सोहळ्याचे आयोजन.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
बाळासाहेबांची_शिवसेना उल्हासनगर यांच्या व माझ्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज उल्हासनगर – ४, सुभाष टेकडी येथे पंचशील बुद्धविहार लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी भगवान गौतम बुद्धांच्या व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे नतमस्तक होऊन उपस्थित पूजनीय भिख्खू संघाचे स्वागत करत बुद्धविहाराचे लोकार्पण केले.तसेच यावेळी आदरणीय भंत्ते राहुल रत्न यांस धम्म कार्याच्या प्रचार व प्रसारास गती मिळावी म्हणून माझ्यावतीने चारचाकी वाहन धम्मरथ म्हणून भेट देत हे धम्म प्रसाराचे कार्य अविरत चालू राहावे यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या शुभ प्रसंगी बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. गोपाळजी लांडगे, उल्हासनगरचे माजी नगरसेवक श्री. राजेंद्र चौधरी, युवासेना शहरअधिकारी श्री. सुशील पवार, बाळासाहेबांची शिवसेनेचे इतर पदाधिकारी व धम्म परिवार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.