कल्याण(ग्रामीण) महारल: नीतू विश्वकर्मा
उल्हासनदी आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज हे समीकरण इतिहासात बऱ्याचदा आपण वाचले असेल. हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार याच उल्हासनदीच्या तीरावरती महाराजांच्या हस्ते उभारण्यात आले. इतिहासा मध्ये उल्हास नदी काठी अनेक चौकी पहारे बसवल्या बाबतच्या नोंदी आहेत. या वरून स्पष्ट सिद्ध होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि उल्हासनदी चे नाते खुप जवळचे होते. याच नात्याला नव्याने उजाळा देण्यासाठी व उल्हासनदीच्या प्रदूषणाकडे लक्ष वेधण्याकरिता उल्हासनदी बचाव कृती समिती, वालधुनी बिरादरी, संविधान प्रचारक आनंदा होवाळ, कोळी समाज मच्छिमार संस्था आणि पर्यावरण नदीमित्र, शिवभक्त यांच्या उपस्थित उल्हास नदीपूजन, जल प्रतिज्ञा आणि शिवआरती या वेळी उल्हास नदी पात्रात एक आगळीवेगळी शिवजयंती १८ फेब्रूवारी संध्याकाळी ५ वाजता मोहना बंधारा शहाड येथे साजरी करण्यात येत आहे. अशी माहिती समितीचे रविंद्र लिंगायत, निकेत व्यवहारे , राकेश कोनकर वालधुनी बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी दिली.