Best WishesKalyan Breaking News
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व बाळासाहेबांची शिवसेनेचे अधिकारी व पदाधिकारी यांनी मलंग गड़ येथे मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेतले.
कल्याण: नीतू विश्वकर्मा
ठाणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याण येथील श्री मलंगगड यात्रेनिमित्ताने आज श्री मलंगगड येथे उपस्थित राहून श्री मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन घेऊन मनोभावे पूजन अर्चन केले.
वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या श्री मलंग उत्सवाला सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेले उपक्रम, कार्य यापुढेही अविरतपणे सुरू ठेवू असे यावेळी बोलताना स्पष्ट केले. मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच श्री मलंगगडावर येण्याचे भाग्य लाभले असल्याचे याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.
सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून देशात सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील सहकारी यांच्या सहकार्याने विकासात योगदान देण्याचे काम करत आहोत असेही यासमयी बोलताना नमूद केले.
याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, आमदार विश्वनाथ भोईर, डॉ.बालाजी किणीकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र सिंह भुल्लर महाराज,उल्हासनगर शहर प्रमुख रमेश चव्हान जी,राजेंद्र चौधरी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, सहकारी तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.