Breaking NewsEducationalheadlineUlhasnagarUlhasnagar Breaking News

शाळा क्रमांक १८ आणि २४ च्या पुनर्बांधणीमध्ये अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दिरंगाई विरोधात मनसेचा आंदोलनाचा ईशारा.

उल्हासनगर:नीतू विश्वकर्मा
प्रभाग समिती क्रमांक २ च्या कार्यक्षेत्रातील उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मराठी शाळा क्रमांक २४ व  लीलाशाह हिंदी माध्यम शाळा क्रमांक १८ या दोन शाळांची ईमारत पुनर्बांधणीच्या नावाखाली ४ वर्षांपूर्वी उ.म.पा. ने जमीनदोस्त केलेली आहे.
  ईमारत जमीनदोस्त करून या शाळेतील विद्यार्थ्यांना ईतर खासगी शाळेत स्थलांतरित करण्यात आले.परंतु तब्बल ४ वर्षे झाली तरी या शाळेच्या बांधकामाला अद्यापपर्यंत सुरुवात झालेली नसल्याने या शाळे अभावी परिसरातील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
 
  शहरातील सामाजिक संस्थांनी, ईतर पक्षातील मंडळींनी ही या विषयावर बराच पाठपुरावा केलेला आहे परंतु उल्हासनगर महानगर पालिकेच्या निष्क्रिय कारभारामुळे आणि नगररचना विभाग,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे या परिसरात राहणाऱ्या शेकडो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना हाल- अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
  
लवकरात-लवकर शाळेच्या पुनर्बांधणीला सुरुवात करून शिक्षणाची आवड असलेल्या शाळेतील गोर-गरीब मुलांचे हाल थांबवावे अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी आहे,
 परिसरातील गोर-गरीब विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि उल्हासनगर महानगर पालिकेच्या या दिरंगाई आणि निष्क्रिय कार्यपद्धती विरोधात  त्या परिसरात राहणारे मनसेचे श्री काळू विश्वनाथ थोरात,विभाग अध्यक्ष बादशहा शेख,राहुल वाकेकर आणि मनविसेचे उप-जिल्हा अध्यक्ष कल्पेश माने,शहर अध्यक्ष वैभव कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने या शाळेच्या शेजारी,अमरधाम चौकात, मंगळवार,दिनांक १४/०२/२०२३,सकाळी ११ वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा ईशारा उ.म.पा. चे माननीय आयुक्त,अतिरिक्त आयुक्तांना पत्राद्वारे देण्यात आला.
 
 परंतु शाळा क्रमांक १८ आणि २४ ची बांधकाम परवानगी मंजूर करून घेतलेली आहे आणि टेंडर प्रक्रियेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ शाळेच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याने मनसेच्या वतीने उपोषण करण्यात येऊ नये,प्रशासनाला सहकार्य करावे  असे लेखी आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला देण्यात आल्यानंतर तूर्तास तरी आंदोलन पुढे ढकलण्यात आलेले आहे.
   
यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम,जिल्हा सचिव संजय घुगे,शहर संघटक मैनुद्दीन शेख,वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात,मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष कल्पेश माने,शहर अध्यक्ष वैभव कुलकर्णी,मनसेचे उप-शहर अध्यक्ष शैलेश पांडव, विभाग अध्यक्ष बादशहा शेख, उप-विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे,विष्णू जाधव,शाखा अध्यक्ष संजय नार्वेकर,अमित फुंदे,जगदीश माने तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights