Best WishesUlhasnagar festival
श्री संत रोहिदास महाराज चौक चौकाचे जयंती पूर्वी सुशोभिकरण.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर – 3 मध्ये क्रिटिकेयर हॉस्पिटल समोर श्री.संत रोहिदास महाराज चौक आहे.व या चौकाची मोठया प्रमाणात दूरअवस्था झाली होती.या बाबत मनसेच्या वतीने वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा सुरु होता परंतु महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत होते 5 फेब्रुवारीला श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती आहे व या जयंतीच्या अगोदर या चौकाचे सुशोभिकारण करण्यात यावे अशी मनसेची मागणी होती जर 5 फेब्रुवारी पर्यंत या चौकाचे सुशोभिकरण केले नाही तर जयंतीच्या दिवशी याच चौकात मनसेच्या वतीने लक्षणिक उपोषण करण्यात येणार होते परंतु मा.आयुक्त अझीज शेख, शहर अभियंता प्रशांत सोळंकी,उपाभियंता संदीप जाधव यांनी 5 फेब्रुवारी पर्यंत जयंती पूर्वी या चौकाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वसन दिले होते.व ते प्रधान्याने पूर्ण केल्या बद्दल मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी मा.आयुक्त,शहर अभियंता व उपाभियंता यांचे आभार मानले.या साठी जिल्हा सचिव संजय घुगे,उपशहर अध्यक्ष मुकेश सेठपलांनी,शैलेश पांडव,सचिन बेंडके,सुभाष हटकर,अनिल जाधव,उपविभाग अध्यक्ष विक्की जिप्सन,अनिल माखीजा,प्रकाश कारंडे यांनी ही यासाठी अथक प्रयत्न केले.