अंबरनाथ चिखलोली मधील वर्षानुवर्षे गावदेवी मंदिराच्या ताब्यात असलेला एम.आय.डी.सी.चा ६००० मी. चा भूखंड सार्वजनिक उपक्रमासाठी मंदिर समितीला द्यावा.
अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा
विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान अंबरनाथ पूर्व भागातील चिखलोली येथे शंभर वर्षे जुने जागृत देवस्थान असलेले “आई गावदेवी माता” मंदिर हे हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असून गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिर परिसरात धार्मिक व सामाजिक उपक्रम आई गावदेवी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातू होत आहे. या संपूर्ण कार्यासाठी म. औ.वि. म. भूखंड क्र. पी एल -४ पी एल -५ हा ६००० मी. भूखंड वर्षांनुवर्षे वापरात असल्याने हा भूखंड सार्वजनिक उपक्रमासाठी मंदिर समितीला देण्यात यावा अशी लेखी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब व उद्योग मंत्री ना. उदयजी सामंत साहेब यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री ना. शिंदे साहेब यांनी उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांना यांना याबाबत कार्यवाही करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.