Ambernath breaking newsBreaking NewsEducationalheadlineHeadline Todaypolitics

अंबरनाथ नगरपरिषदेच्या १६ शाळांमध्ये इंग्रजी पद्धतीने शिकवण्याची परवानगी द्यावी.

 

अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा

विधिमंडळाच्या मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान अंबरनाथ नगरपरिषदेच्या इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना गणित व इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना गणित व विद्यान हे विषय इंग्रजी भाषेतून शिकविण्यास (सेमी इंग्रजी ) परवानगी देण्यात यावी अशी लेखी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब व शालेय शिक्षण मंत्री ना.दीपकजी केसरकर साहेब यांच्याकडे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी केली असून त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या आहेत. यामुळे या प्रस्तावावरील कार्यवाहीला वेग मिळाला आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या मालकीच्या एकुण १८ प्राथमिक शाळा असून त्यामध्ये विद्यार्थी पटसंख्या १५४५ इतकी आहे. सद्यस्थितीत अंबरनाथ शहरामध्ये शासकीय मालकीचे शाळांमध्ये अद्यापपर्यत इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम उपलब्ध नसल्याने शहरातील विद्यार्थ्यांचा ओढा खाजगी शाळांमध्ये वाढत चालला आहे. त्याकरिता शहरामध्ये नगरपरिषद मालकीच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरु करण्याची आवश्यकता आहे. याकरिता अंबरनाथ नगरपरिषद शाळा क्र. १, २, ३, ५, ६, ७, ८, ९, १०, १२, १३, १४, १५,१६,१७,१९ या १६ शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना गणित व इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे विषय इंग्रजी भाषेतून शिकविण्यास ( सेमी इंग्रजी ) सुरु करायचे असून याबाबतचा ठराव ही नगरपरिषदेने केला असून मा. शिक्षण संचालक ( प्राथ.) महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्याकडे मान्यतेसाठी प्रस्ताव ही सादर केला असल्याचे आमदार डॉ.किणीकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

नगरपरिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी शिकविण्यास सुरु करण्यात आल्यास येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. तसेच भविष्यात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक वातावरणामध्ये तग धरण्यासाठी मदत होणार असल्याचे आमदार डॉ.किणीकर यांनी यावेळी सांगितले. 

याआधी नगरपरिषदेच्या दोन शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर सेमी इंग्रजी पद्धतीने शिकवणे सुरू करण्यात येणार होते. परंतु, आता सोळा शाळांमध्ये शिकविण्यात येणार असल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांना फायदा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights