आनंदाचा शिधा किट वाटपाचा शुभारंभ आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याहस्ते अंबरनाथ पूर्व भागातील बारकूपाडा आणि कैलाश कॉलनी परिसरातील शिधावाटप दुकानामधून करण्यात आला.
अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा
राज्यातील सर्व सामान्य जनतेला हिंदू नववर्ष गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करता यावी याकरिता राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लाभार्थी शिधापत्रिका धारकांना ( ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु.५९,०००/- हून कमी आहे.) “ आनंदाचा शिधा ” ज्यामध्ये १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ लीटर खाद्यतेल फक्त १०० रुपयात उपलब्ध करून दिले आहे. या “ आनंदाचा शिधा ” किट वाटपाचा शुभारंभ आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याहस्ते अंबरनाथ पूर्व भागातील बारकूपाडा ( रेशनिंग दुकान क्र. ४६ फ ११९ ) आणि कैलाश कॉलनी परिसरातील शिधावाटप ( रेशनिंग दुकान क्र. ४६ फ १५२ ) या दुकानामधून करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. परशुराम पाटील, माजी नगरसेवक श्री. रवींद्र पाटील, श्री. विकास पाटील, युवासेनेचे श्री. युवराज पाटील, उपविभाग प्रमुख श्री. अशोक दवणे, शाखाप्रमुख श्री. राजू पाटील, श्री. गणेश चौगुले, श्री. नीलेश शिंदे, श्री. कुमार भोपी, श्री. विश्वकर्मा, श्री. विलास काकडे, श्री. गणेश शिंदे तसेच शिधावाटप अधिकारी श्री. शशिकांत पाटसुटे आणि शिधावाटप विभागाचे संबधित अधिकारी वर्ग व मोठ्या संख्येने लाभार्थी शिधापत्रिका धारक उपस्थित होते.