उल्हासनगर काँग्रेस तर्फे २ दिवसीय महिला महोत्सव २०२३ कार्यक्रम संपन्न
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.याच अनुषंगाने उल्हासनगर काँग्रेस दरवर्षी हा दिवस महिलांसाठी कार्यक्रम घेऊन साजरा केला जातो.यावर्षी देखील जिल्हाध्यक्ष रोहित साळवे व माजी गटनेता अंजली साळवे यांनी कुर्ला कॅम्प, काली माता मंदिर येथे दिनांक ११ मार्च व १२ मार्च रोजी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.पहिल्या दिवशी महिलांसाठी सुरक्षितता, आरोग्य, शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण या विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रम तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम वेशभूषा स्पर्धा, नृत्य व गायन स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. डॉ. अनुपमा वर्मा संचालिका परफेक्ट पॅथालाजी, पद्ममा धामणे IAS ऑफीसर बेंगलोर, प्रा.सिंधू रामटेके समाजसेविका अंनिस कार्यकर्त्या, डॉ. लिना धांडे
फिजिओथेरपिस्ट अंबरनाथ यांनी आपापल्या क्षेत्रातील विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी महिलांसाठी डॉज बॉल, संगीत खुर्ची, रक्त तपासणी शिबिर, पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.सर्व महिलांचा आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर खेळ पैठणीचा क्राईम पेट्रोल फेम मराठी कलाकार सतीश नायकोडी यांच्या सोबत आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी काँग्रेस आमदार कार्याध्यक्ष मा. प्रणिती ताई शिंदे व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा श्रीमती संध्याताई सव्वालखे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होत्या.
आपल्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या गाथा सोनवणे, शुभांगी चव्हाण, मोना गवई, रागिणी तेलंग, स्नेहल जाधव, छाया सावंत, सीमा पफाळे, डॉ. शलाका भालेराव, अपर्णा जाधव, शारदा अंभोरे यांचा सत्कार सन्मानचिन्ह देऊन आमदार प्रनितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
महिला या पुरुषानंप्रमाणेच सर्व कामे करू शकतात व फक्त एकच दिवस नाही प्रत्येक दिवस हा महिला दिवस असावा असे मत प्रनितिताई यांनी व्यक्त केले. तसेच देशाला काँग्रेस पक्षाने इंदिरा गांधीच्या रूपाने पहिली महिला पंतप्रधान दिली त्याबद्दल अभिमान व्यक्त केला.
मोदी – भाजप यांच्या राजवटीत महिला महागाईमुळे सर्वात जास्त त्रस्त आहेत, अश्या परीस्तिथी मध्ये महिलांना एक चांगला कार्यक्रम आयोजित करून आनंदचे क्षण या महागाईच्या काळात दिले त्यासाठी मी अंजली साळवे यांचे अभिनंदन करते असे महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती संध्याताई सव्वालाखे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमानंतर वरील सर्व स्पर्धांमध्ये विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीस वाटप करण्यात आले. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेत सोनाली गुडसुंदरे यांनी पाहिले पारितोषिक मिळविले त्यांना LED टीव्ही आणि पैठणी देण्यात आली. लकी ड्रॉ चे विजेते आशा रक्षे यांना फ्रिज देण्यात आला.