Ulhasnagar: नागरी समस्या सोडवणाऱ्या पालिका अधिकारी याला दम देणे हे लज्जास्पद आहे:- जयेश बालाराम जाधव.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
आज दिनांक-१६/१०/२०२३ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) (Republican Party of India (Athavale) कल्याण लोकसभा अध्यक्ष जयेश जाधव यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त (UMC commissioner) यांना पत्रा द्वारे निवेदन दिलं आहे की उल्हासनगर मधील प्रभाग क्र.२० मध्ये पाण्याची भीषण समस्या असून सदर समस्या सोडवण्यासाठी महापालिका पाणीपुरवठा विभागाचे (UMC Water Supply Department) उपअभियंता हे जिगरीने प्रयत्न करत असून काही राजकीय मंडळी त्यांना समस्या सुटू नये म्हणून राजकीय दबाव आणत आहेत व त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याच प्रयत्न करत आहेत,राजकीय द्वेष हा पालिका अधिकारी यांच्यावर दाखवण्या ऐवजी प्रभागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी राजकीय मंडळींनी प्रयत्न केले पाहिजे तर समस्या तशीच रहावी व येत्या निवडणूकित हा मुद्दा राजकीय बनावा म्हणून प्रयत्न चालु आहेत, आरे आपली राजनीती करण्याच्या चक्कर मध्ये सामान्य जनतेला त्रास होईल असे वागणे कितपर योग्य आहे?आरे तुम्ही सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे की समस्या निर्माण करण्यासाठी.राजकारणी मंडळींची ही दादागिरी पालिका आयुक्त यांनी हाणून पाडावी व सामान्य जनतेला न्याय द्यावे म्हणून पालिका अधिकारी यांना विशेष अधिकार देऊन त्यांचे बळ वाढवावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.