आगामी विधानसभा आणि केडीएमसी निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची “आप”ची घोषणा.



डोंबिवली : नीतू विश्वकर्मा
आगामी विधानसभा निवडणुकीसह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीने लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाचे कल्याण डोंबिवलीतील प्रमुख पदाधिकारी तसेच राज्य समितीतील पदाधिकाऱ्यांची एक बैठक डोंबिवली आप (पश्चिम ) महिला अध्यक्षा रेखा रेडकर यांच्या कार्यालयात झाली. त्यामध्ये आगामी निवडणुकीबाबत ही घोषणा करण्यात आली.
राज्यातील महायुती सरकार हे दिल्लीतील आप सरकारची कॉपी करून लाडकी बहीण सारख्या योजनेची महाराष्ट्रात घोषणा करत आहे. तर डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असूनही कल्याण डोंबिवली शहरात मूलभूत सुविधा पुरवण्यात ते अपयशी ठरले असल्याची टिका आपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी केली.
कल्याण डोंबिवली शहरांसाठी आम आदमी पार्टी लवरकच आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी दिली. तर कल्याण डोंबिवली ही शहरे सुशिक्षित नगरी म्हणून ओळखली जात असून आगामी निवडणुकीत आप पक्षाकडून शहरातील सुशिक्षित तसेच तरुण वर्गाला संधी देणार असल्याचे आश्वासन आपच्या डोंबिवली पश्चिम महिलाध्यक्ष रेखा रेडकर यांनी यावेळी दिले.
या बैठकीत आप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंदे ,कल्याण जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड, डोंबिवली पश्चिम महिला अध्यक्षा रेखा रेडकर, युथ विंगचे राहुल दत्ता, रिक्षा यूनीयन अध्यक्षा प्रियांका पाटील , डोंबिवली पूर्व उपाध्यक्ष अवधूत दीक्षित आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते .