Ambernath breaking newsBreaking NewsheadlineSocial
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अंबरनाथ पूर्व लोकनगरी येथे “स्रीशक्ती महिला क्रिकेट चषक- २०२३” आयोजन।
अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अंबरनाथ पूर्व लोकनगरी येथे विभाग प्रमुख श्री. सचिन गुडेकर व माजी नगरसेविका सौ. रेश्मा समीर गुडेकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “स्रीशक्ती महिला क्रिकेट चषक- २०२३” या क्रिकेटच्या सामन्यांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा केला तसेच राजमाता जिजाऊ, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब, मॉसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले व सामन्यांना सुरुवात केली.या सामन्यांमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व महिला संघांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.भारतीय महिला क्रिकट संघ हा जगात अग्रेसर असून स्त्री शक्तीचे दर्शन घडवणार आहे, आज याच सामन्यांच्या निमित्ताने आयोजकांकडून स्त्रियांचा यथोचित सन्मान करण्यात येत आहे अशी भावना यावेळी व्यक्त केली.
तसेच जमलेल्या सर्व महिलांना येत्या ०८ मार्चला साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.