महात्मा ज्योतिबा फुले मराठी शाळा क्र.१७ येथे एक नवीन भव्य वाचनालय उभारावे-उल्हासनगर वंचित बहुजन आघाड़ी
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
बंगल्यात राहणाऱ्या श्रीमंत लोकांच्या लाडक्या लाडकीला भला मोठा AC हॉल अभ्यासासाठी तयारच असतो. पण आपल्या झोपडपट्टीतील अत्यंत हुशार अभ्यासू गरिब गरजू विद्यार्थ्यांना मात्र आपल्या १०×१० च्या घरात अभ्यास करतांना खुपच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे युवा शहर उपाध्यक्ष मा.उज्वलभाऊ महाले (रंगीला) यांनी प्रभाग निरिक्षक मा.ईश्वरभाऊ सोनवणे,शहर उपाध्यक्ष मा.सुरेंद्र तिडके,शहर सचिव मा.हरेशभाऊ कथले, वार्ड अध्यक्ष मा.नितिन भालेराव,वार्ड उपाध्यक्ष मा.मुकेश चौथमल,मा.गौतम निकम यांना सोबत घेऊन उल्हासनगर महानगरपालिकाचे उपायुक्त मा.जमीर लेंगरेकर यांना निवेदन दिले. त्या निवेदनात त्यांनी आमच्या परिसरात गुणवंत हुशार गरजू विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेने महात्मा ज्योतिबा फुले मराठी शाळा क्र.१७ येथे एक नवीन भव्य वाचनालय उभारावे अशी मागणी केली आहे. जेने करून आमच्या परिसरातून IAS,IPS,LLB. सारखे अधिकारी घडातीत आणि त्यांना देशासाठी मोलाचे कार्य करण्याची संधी मिळेल असे त्या निवेदनाद्वारे कळविले आहे. शहराचे उपायुक्त मा.जमिर लेंगरेकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना लवकरात लवकर नवीन वाचनालय उभारून देण्यात येणार असे आश्वासन दिले आहे.