अंबरनाथ पूर्व भागातील तसेच अंबरनाथ पश्चिम भागातील राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने “ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ” येत्या १ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते ऑनलाईनद्वारे या आरोग्य केंद्रांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने “ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ” अंबरनाथ पूर्व भागातील राहुल नगर, ठाकूर पाडा, तसेच अंबरनाथ पश्चिम भागातील भास्कर नगर परिसरातील बहुउद्देशीय समाज मंदिर आणि म. हौ. बोर्ड येथील शिवनगर येथे सुरू करण्यात येत असून येत्या १ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते ऑनलाईनद्वारे या आरोग्य केंद्रांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. शुक्रवारी आरोग्य विभागाच्या व नगरपरिषदेच्या अभियंत्यां समवेत या आरोग्य केंद्राची पाहणी केली. या आरोग्य केंद्रामुळे या परिसरासह लगतच्या परिसरातील नागरिकांना देखील चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.
तसेच या आरोग्य केंद्र पाहणी प्रसंगी अंबरनाथ पूर्व भागातील ठाकूरपाडा येथील आदिवासी बांधवांची पाणी समस्या ही मार्गी लागली असल्याने या आदिवासी बांधवांशी संवाद साधला. पाण्याची समस्या मार्गी लावण्यासोबतच या परिसरातील कच्चा रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने या आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.
यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख श्री. संदीप मांजरेकर, माजी नगरसेवक श्री. सुनिल सोनी, शाखाप्रमुख श्री. रामदास शिंगवे, श्री. सुनिल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बनसोडे, नगरपरिषदेचे अभियंता श्री. राजेश तडवी आदि उपस्थित होते.