अंबरनाथ मधील पालेगाव औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांसंदर्भात एम.आय.डी.सी.प्रादेशिक अधिकारी व ग्रामस्थांसोबत बैठकीचे अंबरनाथ एम.आय. डी.सी.ऑफिस मध्ये आयोजन करण्यात आले होते.
अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा
अंबरनाथ मधील पालेगाव औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांसंदर्भात एम.आय.डी.सी.प्रादेशिक अधिकारी व ग्रामस्थांसोबत बैठकीचे अंबरनाथ एम.आय. डी.सी.ऑफिस मध्ये आयोजन करण्यात आले होते.
या बैठकी दरम्यान पालेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्या संदर्भात सविस्तर चर्चा पार पडली. यामध्ये पालेगाव औद्योगिक क्षेत्र व गावातील वस्तीमध्ये पाण्याची समस्या दूर करण्यासाठी चर्चा पार पडली. यामध्ये नियमित पाणीपुरवठा होण्या संदर्भात कार्यवाही होणे गरजेचे असून त्याकरिता आवश्यक त्याठिकाणी ३ इंची पाइपलाइन टाकण्याच्या सूचना एम.आय. डी.सी.च्या अभियंत्यांना दिल्या.
तसेच पालेगाव मधील “आई गावदेवी माता” मंदिराकरिता वाढीव जागा उपलब्ध करून देण्याकरिता मंदिरालगत असलेल्या व सद्या कंपनी उभारणीकरिता वाटप करण्यात आलेल्या जागेपैकी अतिरिक्त जागा देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना एम.आय. डी.सी.च्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच पालेगाव औद्योगिक क्षेत्रात एम.आय.डी.सी. मार्फत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्राध्यान्य मिळण्यासंदर्भात चर्चा पार पडली. यानुसार ज्याठिकाणी काम करण्यात येणार आहे, त्याच जागेतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्याठीकाणी काम मिळण्याकरिता प्राधान्य देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा सूचना देखील यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
त्याचबरोबर पालेगाव क्षेत्राचा महावितरण विभागाच्या अंबरनाथ विभागाअंतर्गत समावेश करून घेण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असून त्याअनुषंगाने या गावातील विजेच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने एम.आय. डी.सी.मार्फत देखील कार्यवाही करण्यात यावी अशा देखील सूचना दिल्या. तसेच विविध विषयांवर सविस्तर चर्चा पार पडली.
या बैठकीला श्री. विश्वनाथ वारिंगे महाराज, श्री.शिवाजी गायकवाड, श्री.संजय गायकवाड, श्री.सुनिल खरे,श्री. संजय मिसाळ, श्री.समीर देसाई, एम.आय.डी.सी.चे प्रादेशिक अधिकारी श्री. सुनिल भुताळे, शिवाजी नगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अशोक भगत, अंबरनाथ एम.आय. डी.सी.चे अभियंता श्री. अंभोरे तसेच वरिष्ठ अधिकारी व पालेगाव मधील ग्रामस्थ उपस्थित होते.