Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking NewsSocial

वरुण पाटील यांच्या जनसेवालयाच्या माध्यमातुन शासनाच्या विविध योजनांचा शेकडो लोकांनी घेतला लाभ.

कल्याण : नीतू विश्वकर्मा

राज्यातील शिवसेना – भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारकडून जनतेसाठी विविध योजना लागू केल्या आहेत. या योजना संबंधित लोकांपर्यंत पोहचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी भाजप कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्याकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. जनसेवालयाच्या माध्यमातून  शासनाच्या या विविध योजनांचा आतापर्यंत शेकडो लोकांनी लाभ घेतला आहे.

राज्यातील महायुती सरकारने गेल्या काही महिन्यांत राज्यातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना लागू केल्या आहेत. विशेष म्हणजे समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आदी घटकांच्या गरजेनुसार या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना, नवजात मुलींसाठी लेक लाडकी योजना, महिला वर्गासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आई वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांसाठी बालसंगोपन पेन्शन योजनेसह महिला बालविकास अंतर्गत येणाऱ्या सर्व योजना, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी नोंदणी प्रमाणपत्र, निराधार महिला प्रमाणपत्र, बचत गटांसाठी मार्गदर्शन, मतदानकार्ड काढणे- अपडेट करणे अशी सर्व कामे
या विशेष शासकीय योजना मोहिमेद्वारे केली जात असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी दिली आहे. यासाठी शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्या जनसेवालय कार्यालयात एक स्वतंत्र टीम उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तर या शासकीय योजना मोहिमेत आतापर्यंत शेकडो नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला असल्याचे सांगत ज्या लोकांनी अद्यापही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला नसेल त्यांनी लवकरात लवकर जनसेवालय कार्यालयात भेट देण्याचे आवाहनही वरुण पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights