Ulhasnagar City News: उल्हासनगर शहरातील रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेता उल्हासनगर काँग्रेस च्या वतीने ” डांबर व सिमेंट दान ” आंदोलन !
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
संपूर्ण उल्हासनगर शहराच्या (Ulhasnagar City) रस्त्याची अतिशय वाईट दूराअवस्था आहे. वारंवार उल्हासनगर महानगरपालिका (Ulhasnagar Mahanagar Palika) कोट्यवधी रुपय खर्च करून रस्ते दुरुस्त करतात पण ते थोड्या काळासाठी सुद्धा टिकत नसल्याने ते रस्ते पुन्हा खराब होतात. ऐन गणेशोत्सवाच्या सणांमध्ये देखील पूर्ण शहरातील लोकांना हा सन खड्ड्यांमध्ये साजरा करावा लागला.
तरी येणारे दसरा-दिवाळी (Dussehra-Diwali) हे मोठे सण लक्षात घेता महानगपालिका पुन्हा रस्ते दुरुस्त करावे व सादर रस्ते चांगल्या पद्धतीने व दर्जेदार तयार व्हावे यासाठी नागरिकांना होणाऱ्या असुविधा लक्षात घेता, आम्ही नागरिकांना आव्हान देत आहोत की, महानगरपालिके कडून नेमलेले रस्त्यांचे ठेकेदार कुठेतरी रस्त्यामध्ये डांबर कमी वापरत असल्याने किंवा कॉंक्रिट रस्त्यामध्ये सिमेंट कमी वापरत असल्याने व महानगरपालिके च्या अधिकाऱ्यांचा कोणता हि अंकुश ठेकेदारांवर नसल्याने रस्ते वारंवार खराब होत आहेत. तरी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने व नागरिकांच्या सहकार्याने उल्हासनगर महानगरपालिकेस “डांबर व सिमेंट दान ” करणार आहोत जेणे करून प्रशासनाला लाज वाटावी व त्यांना तात्काळ शहरातील रस्ते दुरुस्त करावे.
ज्या नागरिकांना सादर अभियानात सहकार्य करायचे असल्यास त्यांनी दि १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते २ पर्येंत आपले ” डांबर व सिमेंट ” दान उल्हासनगर काँग्रेस(Ulhasnagar Congress party) कार्यालय येथे जमा करावे किव्हा सदर दान देण्यासाठी मंगळवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी दुपारी ४.०० वाजता उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयास येथे येऊन दान द्यावे.सादर विषय संदर्भात अशे लेखी पत्र उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आली आहे.