मंगेश चिवटे राष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित,उल्हासनगरचे वैधकीय कक्ष चे बिपिन सिंग व त्यांचे सहकारी गणपती कांबळे यांनी मंगेश चिवटे सरांचा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे हयांना दै. मनोगत या वृत्तपत्राच्या वतीने राष्ट्र सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मंगेश चिवटे यांचे आरोग्य सेवेतील महत्तवपूर्ण क्षेत्रातील योगदान बघता त्यांना हा पुरस्कार सुप्रसिध्द भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सदर पुरस्कार सोहळा हा भारतरत्न गायनसम्राज्ञी लता मंगेशकर नाटयगृहात संपन्न झाला. हया पुरस्कार सोहळ्यासाठी सन्मानिय अतिथी म्हणून कोकण विभागाचे आयुक्त माननीय डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आयुक्त दिलीप ढोले आदी मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्यांना या सोहळ्यात गौरविण्यात आले. या शानदार पुरस्कार सोहळ्याला सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आज १२ अप्रैल रोजी उल्हासनगर शहर शिवसेना वैधकिय कक्ष चे बिपिन सिंह सहकारी शिवसेना वैद्यकीय कक्ष सह संपर्कप्रमुख श्री.गणपती कांबळे यांनी श्री मंगेश चिवटे सरांचा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि शुभकामनाए दिली.