मनसेच्या पाठपुराव्यानंतर पॅनल क्रमांक १ येथील ओम साई नगर,कमला नेहरू नगर परिसरातील जुन्या,जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
प्रभाग समिती क्रमांक १ च्या कार्यक्षेत्रात, पॅनल क्रमांक १ ओम साई नगर,कमला नेहरू नगर,धोबीघाट या परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून,काही जलवाहिन्यांमध्ये अतिशय संथ गतीने आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तसेच अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटून पाणी रस्त्यावर वाहत असल्याच्या तक्रारी परिसरातील रहिवाश्यांनी मनसेचे पदाधिकारी कैलास घोरपडे,अमित फुंदे,दीपेश धारिवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे केलेल्या होत्या,त्याअनुषंगाने या अतिमहत्वाच्या विषयावर मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी उल्हासनगर महानगर पालिका प्रशासनाला “या विषयावर तात्काळ तोडगा काढण्याचे लेखी निवेदन दिल्यानंतर अति-तातडीने आणि अतिअवश्यक असल्याने उल्हासनगर महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री बुडगे साहेब आणि अभियंता श्री ढोले साहेब यांनी तात्काळ हे काम सुरू करण्याचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर ओम साई नगर परिसरातील जुन्या आणि जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदली करण्यात आल्या आणि कमला नेहरूनगर,धोबिघाट परिसरातील फुटलेल्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच परिसरातील नागरिकांना सुरळीतपणे पाणीपुरवठा होईल असं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
परीसरातील नागरिकांकडून उल्हासनगर महानगर पालिका प्रशासन,पाणीपुरवठा विभाग आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.