महावितरण कडून लादण्यात आलेले Security Deposit Bill वसुलीसाठी नागरिकांकडून सक्ती करू नये – मनसेचे अँड. प्रदिप गोडसे यांची मागणी.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
महावितरण कडून लादण्यात आलेले Security Deposit Bill वसुलीसाठी नागरिकांकडून सक्ती करू नये – मनसेचे अँड. प्रदिप गोडसे यांची मागणी. यावर्षीही महावितरण कडून सन – 2023-2024 साठी नागरिकांना Security Deposit Bill लादण्यात आले आहे. अगोदरच वाढीव वीज बिल व त्यात Security Deposit Bill आणि त्यात अगोदरची करोनाची महामारी त्यातूनच नागरिक अजूनही त्रस्त असतांना महावितरणने Security Deposit ची बिले नागरिकांना लादली आहे. ज्याच्या अनेक तक्रारी मनसे कार्यालयात प्राप्त होत होत्या. त्याअनुषंगाने मनसेचे अँड. प्रदिप गोडसे यांनी महावितरण अधिकारी यांना लादण्यात आलेले Security Deposit बिले ही तात्काळ थांबावावे किव्हा त्याकरिता कोणतीही सक्ती करू नये याकरिता निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या वर्षी देखील याच प्रकारे Security Deposit बिले नागरिकांना लादण्यात आली होती त्याअनुषंगाने मनसेचे अँड. प्रदिप गोडसे यांच्या वतीने बिलाची होळी करत महावितरण कार्यालय, उल्हासनगर -३ या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते व त्यांनतर महावितरणने सदर बिले वसुली करीत स्थगिती दिली होती.परंतू याहीवर्षी महावितरणने सदर Security Deposit Bill नागरिकांना लादून संभ्रम निर्माण केला आहे व महावितरण कर्मचारी यांच्याकडून बिले भरण्यास सक्ती केली जात आहे त्याअनुषंगाने 20.04.2023 रोजी मनसेचे अँड. प्रदिप गोडसे व पत्रकार संजीव कांबळे यांच्याकडून महावितरण अधिकारी उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण यांना निवेदन देऊन सदरचे Security Deposit बिल भरण्यास नागरिकांकडून सक्ती करू नये याकरिता निवेदन देण्यात आले आहे.सदरच्या निवेदनाच्या अनुषंगाने महावितरण अधिकारी यांनी Security Deposit साठी नागरिकांना सक्ती करणार नाही असे आश्वासन देण्यात आले आहे.
तरी देखील महावितरण मार्फत जर कोणीही व्यक्ती Security Deposit भरण्यास सक्ती करत असेल तर त्यांनी थेट मनसेशी संपर्क साधायचा आहे असे आव्हान मनसेचे अँड. प्रदिप गोडसे यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.