महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीचे औचित्य साधून उल्हासनगर ४ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय चे लोकार्पण करण्यात आले.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीचे औचित्य साधून उल्हासनगर येथे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब व स्थानिक नगरसेवक श्री.सुरेश जाधव व सौ.ज्योत्स्ना जाधव यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभागातील नागरिकांकरिता उभारण्यात आलेल्या ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय ” या वास्तूचे अंबरनाथ विधानसभाचे आमदार डॉक्टर बालाजी कीनीकर यांचा हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच याप्रसंगी परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
यावेळी माजी महापौर श्रीमती लीलाबाई आशान, शहरप्रमुख श्री.रमेश चव्हाण,ज्योति माने, ज्योत्सना जाधव, उपजिल्हाप्रमुख श्री. अरुण आशान,सुरेश जाधव,युवा सेना चे सुशील पवार,प्रशांत जाधव, मनसे चे बंडू देशमुख,प्रदीप गोडसे, ऐड कल्पेश माने,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे भारत गंगोत्री,सोनिया धामी,संघर्ष मित्र मंडल चे सर्व पदाधिकारी तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.