वाढत्या कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन प्रशासक तथा आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली उल्हासनगर शहरातील खाजगी DCHC रुग्णालयांचे डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी, नागरी आरोग्य केंद्र-१ ते ६ याची आढावा सभा घेण्यात आली.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
सद्यस्थितीमध्ये ठाणे जिल्हयातील ब-याच शहरामध्ये कोवीड- १९ व H३N२ या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यानुषंगाने उल्हासनगर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्ग विभाग अंतर्गत कोवीड १९ व Influenza आजारा या संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजना व पूर्व नियोजन करणे संदर्भात मा. प्रशासक तथा आयुक्त अजीज शैख यांचे अध्यक्षतेखाली आज दि: ११ अप्रैल २०२३ उल्हासनगर शहरातील खाजगो DCHC रुग्णालयांचे डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी, नागरी आरोग्य केंद्र-१ ते ६ याची आढावा सभा घेण्यात आली.
सदर सभेमध्ये मा. प्रशासक तथा आयुक्त साहेब यांनी कोबीड- १९ प्रतिबंधात्मक व पूर्व नियोजनाच्या अनुषंगाने उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत उपलब्ध असलेल्या उपाययोजन व यंत्रसामग्री यांचा आढावा घेतल. तसेच कोवीड-११ चे व H३N२ या आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेवून उपस्थितीत सर्व खाजगी DCHC रुग्णालयाचे डॉक्टर व नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांना खालील प्रमाणे सुचना देण्यात आल्या आहेत.
१. उल्हासनगर महानगरपालिका, कार्यक्षेत्रात बस स्थानक, रेल्वे स्थानक, रिक्षा स्टँड व गर्दीच्या ठिकाणी येथे कोवीड-१९ तपासणीमध्ये वाढ करण्यात यावी.
२. नागरी आरोग्य केंद्र स्तरावर फिवर क्लिनिक सुरु करण्यात यावेत.
३. उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालय गांची बेड संख्या व आवश्यक साधनसामग्री अद्यावत करुन घेण्यात यावी.
४. तसेच उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी DCHC रुग्णालय यांचे Structral Audit, Electrical Andit, Fire Audit व Oxygen Audit करुण घेण्याबाबत आदेश देण्यात आले.
५. कोबीड-१९ लसीकरण कार्यक्रम तात्काळ सुरु करण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करणेबाबत सुचना दिल्यात.
६. तसेच कोवीड- १९ व H३N२ या आजाराचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी व नियंत्रित राहण्यासाठी या करिता टिम वर्कची
अत्यंत आवश्यकत असल्याचे सुचित करण्यात आले.
७. फोबीड- १९ व H३N२ या आजारा संदर्भात जनजागृती करणे.
८. कोवीड-१९ सारखी लक्षणे असणारे आजार SARI आणि ILI लक्षणे असणा-या रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रीत करुन याबाबतची तपासणी करणेबाबत सुचना देण्यात आल्या.
तसेच त्यानुषंगाने उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जनतेन खालील प्रमाणे जाहीर आवाहन करण्यात येते की,
१. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
२. शिकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल/टिश्यू वापरणे
३. कोवीड- १९ व Influenza आजाराचे लक्षणे आढळल्यास तात्काळ नागरी आरोग्य केंद्र-१ ते ६ येथे संपर्क साधवा
४. संशयित रुग्णांनी घरीच विलगीकरण व्हावे.
५. कोवोड- १९ व Influenza आजाराची तपासणी रेड क्रॉस DCHC सेंटर, उल्हासनगर-३ येथे मोफत करण्यात येत आहे.
६. सदर आजारा संदर्भात प्रतिबंधात्क उपाययोजना व मुबलक प्रमाणत औषधसाठा नागरी आरोग्य केंद्र स्तरावर उपलब्ध केलेला आहे.
तसेच सर्व नागरिकांनी घावरून न जाता पण सावधानता (मास्क लावणे, हात वेळी वेळी सेनिटाइझर करणे, व सुरक्षीत अंतर ठेवावे) बाळगावी. या संदर्भात शासनाने दिलेल्या सुचनांचे व नियमांचे तंतोतंत पालन करावे. कोबीड- १९ व H३N२ चा सामना करणेकरिता सर्व नागरिकांनी प्रशासनास सहाकार्य करावे व सतर्क राहावे.