शाळेची फिस भरली नाही म्हणून विद्यार्थी यांचे निकाल पत्र कसं काय शाळा रोखू शकते : जयेश जाधव
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
आज दिनांक ३० अप्रैल २०२३ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे कल्याण लोकसभा अध्यक्ष जयेश बालाराम जाधव यांनी उल्हासनगर ४ मध्ये स्थित तक्षशिला प्राथमिक इंग्रजी विद्यालय यांनी विद्यार्थी यांची पालकांनी वार्षिक पूर्ण फिस भरली नाही म्हणून त्यांचे निकाल पत्र शाळेने रोखून धरले आहेत अशी तक्रार जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या कडे केली आहे,तसेच शाळा सरळ सरळ पालकांना दम देत आहे की विद्यार्थी यांची पूर्ण फिस भरा अन्यथा निकाल पत्र देण्यात येणार नाही त्यामुळे पालकांना जो मानसिक त्रास होत आहे त्या बाबत जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी तात्काळ शाळेवर योग्य ती कार्यवाही करावी तसेच शाळेला योग्य ते निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे.