Breaking NewsheadlineHeadline TodaySocialUlhasnagarUlhasnagar Breaking News

समृद्धी फाऊंडेशन व मधवबाग उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनी वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले.

 














उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा


आज शुक्रवार दि.07.04.2023 रोजी जागतिक आरोग्य दिनी
समृद्धी फाऊंडेशन व मधवबाग उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले होते.सदर वॉकेथॉन मध्ये रोज रिकाम्या पोटी तीन किलोमीटर चाललात तर मधुमेह व रक्तदाब हा नियंत्रित ठेवला जातो हा संदेश सदर वॉकेथॉनच्या माध्यमातून जनतेला देण्यात आले.सदर वॉकेथॉनमध्ये जवळपास शंभर लोकांनी सहभाग घेतला व सर्व सहभागी व्यक्तींना सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले व त्यातून उत्कृष्ट अश्या तीन व्यक्तींना निवडून पारितोषिक देण्यात आले.
वॉकेथॉन हे लालचक्की चौक पासून सुरुवात करत व्हीनस मार्गे नेताजी चौक ते रामरक्षा हॉस्पिटल व व्हीनस मार्गे लालचक्की चौक येथे समाप्त करण्यात आले. वॉकेथॉनमध्ये अति आवक्षतेनुसार अंबुलन्स सुविधा पुरवत डॉक्टरची सोय नागरिकांसाठी करण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व व्यक्तींना टी शर्ट,  पाणी, व नाश्त्याची सोय देखील त्याठिकाणी करण्यात आली.
नागरिकांनी सदर शिबिरास उत्तम प्रतिसाद देत मधवबाग व समृद्धी फाऊंडेशनचे कौतुक केले व त्यांचा मधवबाग विषय अनुभग देखील शेअर करत आणखीन असे नवनवीन उपक्रम राबवून लोकांची सेवा करावी असा सल्ला देखील दिला.
सदर वॉकेथॉन हे मधवबाग चे उल्हासनगर शाखेचे व्यवस्थापक  डॉ. हनुमंत कारंडे व सामाजिक कार्यकर्ते अँड.प्रदिप कारभारी गोडसे यांनी मेहनत घेत सदर शिबिराचे आयोजन केले होते.




Related Articles

One Comment

  1. Nitu Madam,iss me to madhav bag foundation ke aache kamoka rajnitik dalal logo dwara fyada uthakar khudka political face bankar prachar jaada lag raha hai…..
    Iss me aam nagrika photo dalne ke bajya unh logo ka prachar kar rahe ho aaisa pradarshit ho raha hai…. 😂
    Log samajdar hai sab samajte hai

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights