अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामांचा मुख्याधिकारी व नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा.
अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा
अंबरनाथ नगरपरिषद हद्दीत शासनाच्या विविध अनुदानाअंतर्गत मंजूर विकास कामांचा तसेच नगरपरिषदेत सद्या प्रशासकीय राजवट असून नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांकडून नागरी समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ व नगरपरिषदेच्या खाते प्रमुखाकडून गुरुवारी नगरपरिषदेत आढावा घेतला.
या आढावा बैठकी दरम्यान –
» शहरातील मुख्य रस्ते सोडले तर शहरात अस्वच्छतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून कचरा रोजच्या रोज उचलला जात नसून ड्रेनेजची देखील योग्यती व्यवस्था नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या. तसेच काही सार्वजनिक शौचलयांची अत्यंत दुरावस्था झाली असून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना दिल्या.
» पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुख्य रस्ते तसेच शहरातील विविध भागातील नाले पावसाळ्यात तुडुंब भरून वाहत असतात. तसेच नाल्या लगत असलेल्या घरांमध्ये देखील पाणी शिरत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो. त्यामुळे तातडीने नाल्यांची सफाई करावी अशा देखील सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
» नगरपरिषदेला “ स्वच्छ भारत योजनेअंतर्गत” प्राप्त झालेल्या पुरस्काराच्या निधीतून करण्यात आलेल्या कामांचा तपशील ही यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून मागत आमदार शहरातील अस्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
» शहरातील नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासक म्हणून जबाबदारी घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस द्यावे अशा सूचना मुख्याधिकारी यांना दिल्या असून त्यानुसार दर मंगळवार व गुरुवार हे वार निश्चित करण्यात आले आहेत.
» नगरपरिषदेच्या शाळांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या सेमी इंग्रजी शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा जागेसह नगरपरिषदेस हस्तांतरीत करण्याच्या प्रस्तावा संदर्भात ही सविस्तर चर्चा करण्यात आली.
» माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या “ छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या उभारणी तसेच अंबरनाथ पूर्व भागातील आरक्षण क्र. ११९ येथे समाज कल्याणच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या “ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन” उभारणे, तसेच पालेगाव येथे वारकरी भवन उभारण्या संदर्भात नगरपरिषदे मार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा ही यावेळी आढावा घेतला. तसेच यावेळी शासनाच्या विविध अनुदानाअंतर्गत मंजूर विकास कामांचा देखील सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीला शिवसेना उपशहरप्रमुख श्री. परशुराम पाटील, श्री. पुरुषोत्तम उगले, माजी नगराध्यक्ष श्री. सुनिल चौधरी, माजी नगराध्यक्षा श्रीमती प्रज्ञा बनसोडे, माजी उपनगराध्यक्ष श्री. अब्दूलभाई शेख, माजी नगरसेवक श्री. सुभाष साळुंके, श्री. रवींद्र पाटील, श्री. संदीप तेलंगे, विभागप्रमुख श्री. शिवाजी गायकवाड, श्री. सचिन गुडेकर, युवासेना तालुका प्रमुख श्री. शैलेश भोईर, शहर अधिकारी श्री. राहुल सोमेश्वर, श्री. निशाण पाटील, महिला आघाडीच्या सौ. सुषमा रसाळ, सौ. लिना सावंत, सौ. वनिता वाघ, नगरपरिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, खाते प्रमुख तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी व युवा सैनिक उपस्थित होते.