Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News
उल्हासनगर मधील श्री स्वामी शांती प्रकाश ( प्रभात गार्डन )उदयानाची दूरअवस्था.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर 5 मधील श्री स्वामी शांती प्रकाश उदयान म्हणजेच (प्रभात गार्डन ) या उदयानाची मोठया प्रमाणात दूरअवस्था झाली आहे. उल्हासनगर 4 आणि 5 मध्ये हेच सर्वात मोठं जून उदयान आहे.या उदयानात मोठया प्रमाणात लहान मुले व जेष्ठनागरिक येत असतात.सकाळी उल्हासनगर 4/5 मधील जेष्ठनागरिक मोठया प्रमाणात वॉकसाठी येतात.परंतु ठेकेदाराने या उदयानातील व्यामाच साहित्य काढून मोठया प्रमाणात मातीचे ढिगारे करून ठेवलेत.संरक्षण भिंतीच्या जाळ्या चोरीला गेल्यात सर्व साहित्य अस्तव्यस्त पडलंय.या उदयानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी या आधी सुद्धा करोडो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत.व आत्ता म्हणजे 05/10/2021 ला या उदयानाच्या दुरुस्तीसाठी 99,85100 रुपयाची वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. व ठेकेदाराला 9 महिन्यात हे काम पूर्ण करायचं होत.परंतु ही वर्क ऑर्डर निघून 18 महिने उलटले तरी उदयानाची अवस्था जैसे थेच आहे. नियमानुसार ठेकेदारावर प्रशासनाने कारवाई कारणे अपेक्षित होते परंतु ‘तेरी भी चुप मेरी भी चुप अशी अवस्था सध्या महापालिका प्रशासनाची झाली असल्याचे मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी सांगितलं परंतु जर तात्काळ हे काम सुरु केल नाही तर मनसे शहर अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार.मनसेच्या वतीने कल या उदयानाची पाहणी करण्यात आली पाऊस सुरु झाल्यास या उदयाना चिखल होऊन चालणे मुश्किल होणार आहे.त्यावेळी शहर अध्यक्ष बंडू देशमुख, उपशहर अध्यक्ष शैलेश पांडव,विभाग अध्यक्ष सागर चौहान, सुहास बनसोडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.