उल्हासनगर मध्ये धक्कादायक घटना शिवसेना शाखाप्रमुखांची निर्घृण हत्या.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच मधील जय जनता कॉलनी परिसरातील शिवसेना शाखाप्रमुख शब्बीर नामक इसमावर चाकुने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झालेला असून विक्रम कोटनकर व त्यांचा सोबत असलेल्या सात ते आठ साथीदाराने मिळून हा हल्ला केल्याच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेआहे. हल्लेखोर विक्रम यांनी जवळपास 15 ते 16 वेळा चाकूने शब्बीर वर वार केले व शब्बीरचा जागीच मृत्यू झाला. शव पोस्टमॉर्टम करण्यासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती सहाय्यक आयुक्त मोतीचंद राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे, मधुकर कड, राजेंद्र कोते यांना समजतात घटनास्थळी पाहणी केली असता.सीसीटीव्ही फुटेच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात सुरुवात केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी उल्हासनगर क्राईम ब्रँच व हिल लाईन पोलीस स्टेशन ठाण्यातील पथकाची शोध घेण्यास सुरुवात केली आहे.ही घटना पूर्व वैमन्याशातून हत्या झाल्याच्या संशय पोलिसांना येत आहे.