उल्हासनगर मनसेच्या पाठपुराव्या यश स्वामी शांती प्रकाश ( प्रभात गार्डन ) उदयानाच्या कामाला सुरवात.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर – 5 मध्ये उल्हासनगर महापालिकेचे स्वामी शांती प्रकाश ( प्रभात गार्डन ) उदयान आहे.उल्हासनगर 4 व 5 मधील हे सर्वात मोठं व जून मैदान आहे.या उदयानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी उल्हासनगर महानगर पालिकेने मागील काही वर्षात लाखो रुपये खर्च केलेत.परंतु हे उदयान आजही जैसे थे अवस्थेत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना व इतर राजकीय पक्षांनी पाठपुरावा केल्यानंतर या उदयानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाने 05/10/2021 रोजी 99,85,100 रुपयाची वर्क ऑर्डर काढण्याआली या वर्क ऑर्डर मध्ये उदयानाचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला 9 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता.ठेकेदाराचा 9 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर वरून आज जवळपास 10 महिने उलटले म्हणजे 19 महिने झाले तरी हे मैदान जैसे थे अवस्थेत आहे.ठेकेदाराने ठिकठिकाणी मातीचे ढिगारे करून ठेवलेत अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपलाय जर पाऊस सुरु झाला तर या उदयादानात चिखलच चिखल होईल.मुलांना शाळेची सुट्टी लागलीय,दररोज शेकडो जेष्ठनागरिक सकाळी व संद्याकाळी या उदयानात वॉकसाठी येत असतात परंतु ठेकेदाराने उदयानाची अशी अवस्था करून ठेवलीय तर मुलांनी खेळायचं कुठे.व जेष्ठनागरिकांनी चालायचं कुठे असे अनेक प्रश्न मनसेचे बंडू देशमुख यांनी महापालिका आयुक्त अजिज शेख यांच्या समोर उपस्थित केले. आयुक्तांनी तात्काळ शहर अभियंता प्रशांत सोळंकी व उपाभियंता अश्विन अहुजा यांना बोलावून तात्काळ कारवाईचे आदेश दिले.या उदयानाची संरक्षण भिंत ठिकठिकाणी तुटली आहे.या भिंतीवरील झाळया चोरीला गेल्या आहेत.या उदयानां बाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित असतांना प्रशासनातील काही अधिकारी मात्र ठेकेदार आपला नातेवाईक असल्यासारखे या कामाकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप बंडू देशमुख यांनी केला.या चर्चे अंती एका आठवड्यात काम सुरु करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आलं होत.अन्यथा मंगळवार दिनांक 30/05/2023 रोजी रोजी आंदोलन करण्याचा ईशरा मनसे ने दिला होता.तसेच सदर ठेकेदाराकडून वर्क ऑर्डरची मुदत संपल्याच्या दिवसापासून शासन नियमानुसार दर दिवसाला दंड वसुल करण्यात यावा तसेच सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून हे काम तात्काळ दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात यावं अशी मागणी सुद्धा मनसेच्या वतीने करण्यात आली होती.अखेर या गार्डनच्या कामाला सुरवात करण्यात आली.
यावेळी मनसेचे जिल्हा सचिव संजय घुगे, बंडू देशमुख,सुहास बनसोडे,सागर चौहान मनविसेचे शहर सहसचिव तन्मेश देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.