कोविड- १९ महामारीत मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या मुलांना RTE अंतर्गत मोफत शिक्षण योजनेचा लाभ द्यावा,अंबरनाथ चे आमदार बालाजी कीनीकर ची राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे लेखी मागणी.
अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा
वैश्विक महामारी ठरलेल्या कोविड – १९ च्या काळात सबंध महाराष्ट्रात अनेक विद्यार्थ्यांचे वडील / पालक मृत्युमुखी पडले. त्यांच्या मुला-मुलींना कोणत्याही प्रकारचा आधार राहिला नसल्याने त्यांना RTE अंतर्गत मोफत शिक्षण योजनेचा लाभ द्यावा अशी लेखी मागणी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शालेय शिक्षण मंत्री ना. श्री.दिपकजी केसरकर साहेब यांना ही विनंती मान्य करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. आरटीई प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्याने यंदाच्या वर्षाची प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील वर्षी या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळू शकेल.