दैनिक नवभारत/नवराष्ट्र समूहाचा वतीने उल्हासनगर मनसेचे मैनुद्दीन शेख यांचा आदर्श समाजसेवक म्हणून सन्मानित करण्यात आले.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
नवराष्ट्र सन्मान सोहळा ठाणे,२० मे २०२३ रोजी प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर,भोईवाडा,कल्याण याठिकाणी संपन्न झाला, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा यात सन्मान करण्यात आला.यामध्ये उल्हासनगरचे सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मैनुद्दीन शेख यांना आदर्श समाजसेवक म्हणून सन्मानित करण्यात आले.
सामाजिक संघटना व पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्य,जनसामान्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे आक्रमकपणे निर्णायक पाठपुरावा करणे आणि प्रभागात विकासकामे करून घेणे,उल्हासनगर शहरातील मुस्लिम समाजाला कब्रिस्तान मिळवून देण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत केलेला यशस्वी पाठपुरावा आणि यासारख्या केलेल्या अनेक समाजकार्यांची दखल घेत सहकाऱ्यांच्या मदतीला नेहमी धावून येणारे आणि सर्वधर्मसमभावाचा ठेवा जपणारे, आमचे जिवलग सहकारी मित्र श्री मैनुद्दीन भाई शेख यांना सन्मानित करण्यात आले या बद्दल मैनुद्दीन भाई शेख यांचे हार्दिक,हार्दिक अभिनंदन व असेच भरीव समाजकार्य आपल्या हातुन होत राहो या सदिच्छा.