मनसे नेते श्री अमित साहेब ठाकरे यांच्या मागणीला यश.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
“शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत पूर्व प्राथमिक वर्गांचा (नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सीनियर केजी) समावेश करून या वर्गांसाठीही RTE अंतर्गत राखीव जागांचा कायदा लागू करणं गरजेचं आहे” अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितसाहेब ठाकरे यांनी राज्याचे शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर यांच्याकडे केली होती.
दोन आठवड्यांनी “नर्सरी सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून परवानगी घ्यावी लागणार” असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
शिक्षणक्षेत्रात प्री-प्रायमरीच्या नावाखाली सुरू असलेल्या धंद्याला चाप बसून पूर्व प्राथमिक वर्गापासून RTE शिक्षण हक्क लागू होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल.
गोरगरिबांच्या शिक्षण हक्कासाठी भूमिका मांडणारे एकमेव युवा नेते सन्माननीय श्री. अमितसाहेब ठाकरे यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन.