लाल फितीत अडकलेला उल्हासनगर पालिकेचे म्हारळ रुग्णालय.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
अगदी कल्याण आणि उल्हासनगर या शहरापासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या म्हारळगाव याहीपेक्षा सांगायचं म्हटलं तर उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील एक महत्त्वाचं गाव. या गावची जमीन काही वर्षांपूर्वी डेव्हलपमेंट च्या नावाखाली उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये वर्ग केली जाते आणि त्यावरती मोठमोठे गृह संकुल उभारले जातात. सरकारी मुलामा देण्यासाठी आधीच ग्रामपंचायतच्या हक्काची वर्ग केलेली जागा त्यामधून उल्हासनगर महानगरपालिकेला गार्डन, रस्ते आणि एक हॉस्पिटल साठी जागा दिली जाते यावर मागील जवळपास एक वर्षापासून पूर्णत्वास गेलेले हॉस्पिटला बऱ्याच नेत्यांमार्फत वेळोवेळी भेटी दिली जातात पण, ते सामान्य नागरिकांसाठी खुले जात नाही, याचं नेमकं कारण काय? यावरती विचार काय? नेहमीच म्हारळ, वरप आणि कांबा या गावांचा वापर फक्त उल्हासनगर विधानसभा क्षेत्रतील मतदार गाव म्हणून केला जातो, पण ज्यावेळेस सुख – सुविधा पुरवण्याची वेळ येते, त्यावेळेस सगळेच नेतेमंडळी मूग गिळून गप्प बसतात. या परीस्थितीला मत विक्री जनता हि तेवढीच जबाबदार आहे, कारण मगदानाच्या वेळी मतदार विकत घेणारे कंत्राटदारांपुढे येतात व त्यांना रीतसर याची ठेका दिला जातो आणि मतदार मतासकट विकला जातो. याची खंत आजही कायम सलते. आज लाखो लोकसंख्या असलेल्या या म्हारळगावाला प्राथमिक सुविधांसाठी जवळच्या महानगरपालिकेंवरती उदरनिर्वाह करावा लागतो, सांगायचं म्हटलं तर त्याच उत्तम उदाहरण म्हणजे स्मशानभूमी आणि सुरक्षा.
म्हारळच्या देय केलेल्या जागेत उल्हासनगर पालिकेचे रुग्णालय बांधले जाते, पण त्याचा उपभोग म्हारळ, वरप आणि कांबा येथील लोक घेतील म्हणून का? या रूग्णालयाला लालफितीत पुरले जात आहे का? यांचा संशय येथील स्थानिकांना आल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी रुग्णसेवेला सुरूवात जरी झाली तरी स्थानिक भूमिपुत्रांना या ठिकाणी पहिले प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ठाकरे सेनेचे युवा शहर अधिकारी निकेत सखाराम व्यवहारे यांनी केली.