पॅनल १ मधील खेमानी नाल्याची तसेच परिसरातील अनेक नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्याची मनसेची मागणी.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगर पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील अनेक मोठ्या नाल्यांची सफाई सुरू आहे,आज सुट्टी असतांना देखील मा.आयुक्त श्री अजीज शेख यांनी स्वतः गुलशन नगर येथील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली,सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे,मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार,पॅनल १ चे स्वच्छता निरीक्षक प्रदीप राजगुरू हे ही सोबत उपस्थित होते.
परंतु कमला नेहरू नगर, धोबिघाट,प्रभाग १ येथुन वाहणारा खेमानी नाला आणि किर्ती पथ परिसरातील काही नाले यांची अद्यापही सफाई झालेली नसल्याने पहिल्या पावसात नाले तुंबून परिसरातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने उल्हासनगर महानगर पालीका प्रशासनाने त्वरित खेमानी नाला आणि धोबीघाट परिसरातील ईतर नाले यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करून घ्यावी असे परिसरातील रहिवाश्यांचे ही म्हणणे आहे.आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पॅनल १ परिसरातील नाल्यांची पाहणी केली आणि किर्ती पथ,कमला नेहरू नगर धोबिघाट परिसरातील नाल्यांची सफाई झालेली नसल्याचे उल्हासनगर महानगर पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी मनसेचे मैनुद्दीन शेख,कैलास घोरपडे,जगदीश माने,मनविसे चे गोरख उदार, वाहतूक सेनेचे अमित फुंदे आणि मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.