अँड. प्रदिप गोडसे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्र -१३ मध्ये वट पूजन मोठ्या उत्साहात साजरी.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
शनिवार दि.०३.०६.२०२३ उल्हासनगर शहरातील पॅनल क्र-१३ मध्ये लालचक्की चौक या ठिकाणी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात वडाच्या झाडाचे प्रमाण घटले आहे आणि त्यात महिलांना वट पूजनासाठी त्यांच्या जवळपास कुठेच वडाचे झाड राहिले नाही. सुहासिनी महिला वडाच्या झाडाचे पूजन करून सदर झाडाभोवती दोरा बांधत आपल्याला सातजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. परंतु शहराल भागात वडाच्या झाडाचे प्रमाण घटत चाल्याने मनसेचे अँड. प्रदिप गोडसे, मनीषा गोडसे व वैभव कुलकर्णी यांनी मिळून महिलांना सोयीस्कर व्हावे म्हणून लालचक्की चौक, उल्हासनगर -४ या ठिकाणी मूळ वडाचे झाड लावून त्याठिकाणी सावलीसाठी मोठा मंडप उभारून सुहासिनींसाठी वट – पूजनाची सोय करण्यात आली होती. सदर ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व पूजा करीता भटजीची सोय करण्यात आली होती.
सदर वटपौर्णिमेला महिलांनी खूप चांगला प्रतिसाद देत अनेक महिलांनी याचा लाभ घेत आयोजकांचे आभार व्यक्त करत कौतुकही केले. सदर कार्यक्रम दर वर्षी आम्ही करत आहोत व यापुढे देखील करत राहणार असे अँड. प्रदिप गोडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. अँड. प्रदिप गोडसे हे सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असतात ज्याचे सर्व स्तरून कौतुक होत आहे.